शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस, चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:13 IST

गेल्या २४ तासात किती झाली पावसाची नोंद.. जाणून घ्या

अजित जाधव 

महाबळेश्वर : जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने महाबळेश्वरमध्ये धुवांधार सुरूवात केली आहे. यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार महाबळेश्वर शहरात गेल्या २४ तासात १८९ मिमी ७ इंच पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पाऊस होत असल्याने  पर्यटन स्थळावरील सेल्फी पाईंट तसेच तालुक्यातील लिंगमळा धबधबा, भिलार धबधबा, अंबनळी व तापोळा घाटातील सर्व लहान मोठे धबधबे तसेच (तलाव, वाहत असलेले ओढे-नाले, पूल) अशा धोकादायक ठिकाणी जाणे पर्यटकांनी टाळावे असे अवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.महाबळेश्वरमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. कडाक्याची थंडी, दाट धुक्यासह पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे वेण्णालेकच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ओढे नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पावसाचा  मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकाची तुरळक गर्दी आहे. वेण्णालेकसह परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे.प्रसिद्ध लिंगमळा धबधबा प्रवाहित झाला आहे. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. दि. १ जून ते १८ जून या कालावधीत ४६५. ६ मिमी (१८.३३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेर पर्यत २४ तासात १८९ मिमी ७ इंच तर एकूण ६५५ मिमी २५ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला. दरम्यान दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम सुरू आहे. यामार्गावरील वाहतूक मांघर मार्गे झोंळखिंड वळविण्यात आली आहे.