शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सातारा: अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा, शेजारील शाळेच्या इमारतीला धोका

By दीपक शिंदे | Updated: July 21, 2022 12:36 IST

महसूल विभागाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे दिले आदेश

पाचगणी : अतिवृष्टीमुळे दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगरा शेजारी असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे असे आदेश तातडीने दिले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की पाचगणी पासून  केवळ एक किलोमीटर वर असणाऱ्या दांडेघर हद्दीत असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीच्या बाजूला असणारा सर्व्हे नंबर २३ / ६ हा डोंगर अतिवृष्टीने सुमारे अडीच फूट खाली खचला. डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.तलाठी  दीपक पाटील, निलेश गीते व उपसरपंच जनार्दन कळंबे, अशोक कासूर्डे यांचे उपस्थितीत हा पंचनामा केला. यावेळी येथील परिस्थीतीची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक क्षेत्रात असणाऱ्या शाळेच्या इमारतीला धोका असल्याने अधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांना तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत.सध्या पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दांडेघर येथील डोंगर पावसाने खचला असल्याचे उपसरपंच जनार्दन कळंबे यांच्या निदर्शनास आल्याने सर्वांना बोलावून पंचनामा केला आहे.  या भेगांमुळे शाळेच्या लागत असणारी दरड पाण्याच्या टाक्या जवळ आली आहे. तर एक वृक्ष ही यामध्ये उन्मळून पडला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान