कृष्णाच्या हरकतींवर सुनावणी; निकालाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST2021-04-28T04:42:53+5:302021-04-28T04:42:53+5:30

कराड :रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी काही दिवसांपूर्वीच ...

Hearing on Krishna's objections; Waiting for the result! | कृष्णाच्या हरकतींवर सुनावणी; निकालाची प्रतीक्षा !

कृष्णाच्या हरकतींवर सुनावणी; निकालाची प्रतीक्षा !

कराड :रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावर १६० हरकती दाखल झाल्या होत्या. मंगळवारी (दि.२७) रोजी या हरकतींवर सुनावणी झाल्याची माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली.

डोईफोडे म्हणाले , आमच्या कार्यालयाकडे सुमारे १६० हरकती आहेत. त्यामध्ये आमचे मतदारयादीमध्ये नावच नाही; जमीन नावावर नाही तरी हे सभासद कसे झाले आहेत, चुकून मयत म्हणून दाखविले गेले आहे अशा प्रकारच्या हरकती आहेत. त्याबरोबर दोन संस्थांच्या ठरावाच्या नावात अदलाबदल झाली होती त्याबाबतची एक हरकत आहे.

या सर्वांवर सुनावणी झाली असून, तीन मेपर्यंत निकाल देण्याची मुदत आहे. त्या दिवशी निकाल देणार आहोत. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल, असेही डोईफोडे म्हणाले.

Web Title: Hearing on Krishna's objections; Waiting for the result!