शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: स्वाभिमानीच्या 'त्या' याचिकेवर उद्या मुंबईत सुनावणी

By प्रमोद सुकरे | Updated: March 20, 2025 16:30 IST

शेवटच्या तारखेपर्यंत धाकधुक..

प्रमोद सुकरे  कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवला होता. त्यावर थोरात यांनी त्यांच्यासह ९ जणांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केले होते. त्यात ते अर्ज पुन्हा वैध ठरवले. मात्र निवास थोरात यांच्या या निकाला विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे रिट पिटिशन दाखल केले आहे. त्यावर शुक्रवार दि २१ रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

शेळके म्हणाले, खरंतर निवास थोरात यांच्या अर्जांच्या विरोधात आमच्या संघटनेचे उमेदवार मुरलीधर गायकवाड यांनी हरकत घेतली होती. ती हरकत बरोबर असल्यानेच निवडणूक अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. मात्र थोरातांनी लगेचच पुणे येथील साखर सहसंचालकांकडे अपील केले. त्यावर १३ मार्चला सुनावणी झाली.

तेथे नेमके काय घडले हे माहित नाही. पण निकाल बदलला व त्यांनी हा अर्ज १८ मार्चला वैद्य धरला. पण आम्हाला हा निकाल मंजूर नसल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली.बुधवारी दि.१९रोजी रिट पिटिशन दाखल केले. आता शुक्रवार दि २१ रोजी याबाबत सुनावणी घेतली आहे.

याबाबत न्यायालयाने उमेदवार निवास थोरात, प्रादेशिक सहसंचालिका नीलिमा गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्यासह २०७ जणांना नोटीस काढली आहेत. त्यात त्यांना हजर रहाण्याचे नमुद केले आहे. न्यायालयात आमचे वकिल बाजू मांडतील. आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.

शेवटच्या तारखेपर्यंत धाकधुक..खरंतर सह्याद्री कारखाना निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २१ मार्च आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यातच निवास थोरात यांच्या अर्जावर मुंबईत याच दिवशी सुनावणी होत असल्याने नेमके काय होणार ? याची धाकधूक त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाHigh Courtउच्च न्यायालय