युवतीला फिरायला नेले अन् अत्याचार केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST2021-04-18T04:38:49+5:302021-04-18T04:38:49+5:30

सातारा : ओळखीच्या मुलीला फिरायला जाऊ, असे सांगून नेले व मित्राच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात अत्याचार केल्याची घटना घडली. ...

He took the girl for a walk and tortured her | युवतीला फिरायला नेले अन् अत्याचार केला

युवतीला फिरायला नेले अन् अत्याचार केला

सातारा : ओळखीच्या मुलीला फिरायला जाऊ, असे सांगून नेले व मित्राच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित युवतीच्या वडिलांनी औंध पोलीस ठाण्यात मंगेश धनाजी पवार (रा. अंबवडे, ता. खटाव) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही तिच्या गावात असताना संशयित पवार हा तिथे गेला व त्याने त्याच्याडकील दुचाकीवर तिला बसवून आपण फिरायला जाऊ असे सांगितले. त्यानंतर ती युवती त्याच्या दुचाकीवर बसली असता त्याने थेट अंबवडे येथील बांधकाम सुरू असलेले त्याच्या मित्राचे घर गाठले. तिथे गेल्यावर त्याने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली असता तिने नकार दिला. तरीही संशयिताने तिच्यासोबत जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: He took the girl for a walk and tortured her