जिहे येथून दुचाकी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:42+5:302021-05-23T04:39:42+5:30
सातारा : तालुक्यातील जिहे येथून एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात ...

जिहे येथून दुचाकी चोरीस
सातारा : तालुक्यातील जिहे येथून एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबतची फिर्याद राजेश शैलश साळुंखे (वय २२, रा. धामणेर, ता. कोरेगाव, जि. सातारा) याने दिली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, राजेश साळुंखे याने मंगळवारी (दि. १८) सायंकाळी सात वाजता त्याची दुचाकी (क्र. एमएच ११ - सीएन २८६२) जिहे हद्दीत असणाऱ्या हॉटेल पसंतच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी नव्हती. याप्रकरणी त्याने दि. २१ मे रोजी तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक राऊत हे करत आहेत.