वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या भक्तवडी परतवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संपत नामदेव दिसले यांची चेअरमन तर बापट लक्ष्मण दिसले यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलप्रमुख नरसिंगराव दिसले यांनी या सोसायटीची सत्ता मिळवली होती. यासाठी संजय जाधव, नारायण दिसले, किसान दिसले, परतवडीचे सरपंच उमेश दिसले, सचिन जाधव, अनिल जाधव, धनाजी जाधव, लक्ष्मण विठ्ठल जाधव, विजय परदेशी, वसंत कुंडलिक जाधव यांनी पार्टीप्रमुख म्हणून काम पहिले.
या निवडीबद्दल आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, तालुकाध्यक्ष भास्कर नाना कदम, सुनील भोसले, नीलेश जगदाळे, प्रशांत पवार, नीलेश कदम, गजानन मोरे, प्रकाश पवार, जयदीप पिसाळ, संतोष चव्हाण, संदीप भोसले, शकिला पटेल यांनी झालेल्या विकास सेवा सोसायटीच्या निवडीबद्दल कौतुक केले.