चक्क डोकं आपटून म्हणे,’ ती मी नव्हेच!’

By Admin | Updated: November 6, 2014 22:58 IST2014-11-06T21:49:19+5:302014-11-06T22:58:15+5:30

धस कॉलनीत अजब प्रकार : संशयित शेळी चोर महिलेचा थयथयाट पाहून पोलीसही गपगार

He said, 'I am not that!' | चक्क डोकं आपटून म्हणे,’ ती मी नव्हेच!’

चक्क डोकं आपटून म्हणे,’ ती मी नव्हेच!’

सातारा : येथील धस कॉलनीमध्ये शेळी चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या महिलेला काही नागरिकांनी पकडले. त्यामुळे त्या महिलेने स्वत:चे डोके दगडावर आपटल्याने ती महिला जखमी झाली. संशयित महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार गुरुवारी दुपारी घडला.
मंगळवार पेठेतील धस कॉलनीमध्ये एक महिला दुपारी संशयितरीत्या फिरत होती. काही महिला आणि नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. शेळी चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच काही नागरिकांनी तिला पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे त्या महिलेने आरडाओरडा केली.
त्यानंतर तिने स्वत:चे डोके दगडावर आपटून घतले. हा प्रकार पाहून काही महिला घाबरून गेल्या. त्या महिलेने जमिनीवरच लोळण घेतले. काहींनी शाहूपुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी आले. पोलीस जीपमधून त्या महिलेला शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्या महिलेची चौकशी केली असता, ती संबंधित महिला मंगळवेढा तालुक्यातील असून, मुले व पती तिच्याजवळ राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

चक्क डोकं आपटून म्हणे,’ ती मी नव्हेच!’
धस कॉलनीत अजब प्रकार : संशयित शेळी चोर महिलेचा थयथयाट पाहून पोलीसही गपगार
चोरी करण्याच्या उद्देशाने कॉलनीमध्ये आलेल्या संशयित महिलेला नागरिकांनी पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, ‘परत येतो,’ असे सांगून काही लोक निघून गेले आहेत, ते पुन्हा आलेच नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रार असल्याशिवाय त्या महिलेवर गुन्हा दाखल कसा करणार, असा पोलिसांना मोठा प्रश्न पडला आहे. ज्या लोकांनी त्या महिलेला पकडले. त्यांच्या मोबाईलवर अनेकदा पोलिसांनी फोन केले. परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचेही शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. केवळ आरोपीला पकडून काहीच उपयोग होत नसतो, तक्रार दिली तरच त्याच्यावर कारवाई होत असते. हे नागरिकांना कोण सांगणार.

Web Title: He said, 'I am not that!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.