तो बिबट्या नव्हेच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:24+5:302021-09-17T04:46:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराचा कानाकोपरा पिंजल्यानंतर अखेर 'तो' बिबट्या नव्हेच या निष्कर्षाप्रत वनविभाग आला आहे. ...

तो बिबट्या नव्हेच...!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराचा कानाकोपरा पिंजल्यानंतर अखेर 'तो' बिबट्या नव्हेच या निष्कर्षाप्रत वनविभाग आला आहे. पदचिन्हे आणि कॅमेरा ट्रॅपचे फुटेज धुंडाळल्यानंतर ही खात्री करण्यात आल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.
सातारा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बिबट्या दिसल्याचा कांगावा झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचा-याने बिबट्या दिसल्याचे माहिती सुरक्षारक्षकाला दिली होती. हे वृत्त शहरभर पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यालय असल्याने उत्सूकतायुक्त भीती पसरली होती. १५ दिवसांपूर्वी ही घटना घडली.
वनविभागाच्या अधिका-यांनी पडत्या पावसात येऊन संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार धुंडाळून काढले. मात्र कोणतीही ठोस माहिती अथवा बिबट्याचे अस्तित्व दर्शविणारी कोणतीही चिन्हे हाती लागली नाहीत. सुमारे चार तासांच्या सर्च आॅपरेशन नंतर रात्री साडेअकराच्या सुमारास शोधकार्य़ थांबविण्यात आले होते.
पाऊस मोठा असल्याने दुस-यादिवशी सकाळी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या श्वान पथकाने बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही ठोस काही हाती लागले नाही. कर्मचा-याने दावा केलेला तो प्राणी बिबट्याच आहे का? याची खातरजमा करण्यासाठी वन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दोन कॅमेरा ट्रॅप बसविले होते. तीन दिवसांनी त्याचे फुटेज तपासण्यात आले.
कोट :
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यादिवशी तसेच दुस-या दिवशीही बिबट्याच्या अस्तित्वाची कोणतीच चिन्हं आढळून आली नव्हती. तथापि विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हांला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. सर्व शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही आवारात दोन कॅमेरा ट्रॅप बसविले होते. मात्र त्यामध्येही काहीही आढळले नाही.
डाॅ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल, सातारा