शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात बंद घर फोडून १३ तोळे सोने लंपास- नागठाणे, अतीत येथे मटका अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:27 IST

घरातून तब्बल १३ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ....मटकाविरोधी कारवाईत सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात करण्यात आला.

ठळक मुद्देसुमारे दोन लाख तीन हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

सातारा : शहराच्या उपनगरातील विलासपूरमध्ये राहणाºया वसंतराव हणमंत जाधव (वय ७६,रा. राधिका नगर, प्लॉट न. ३७) यांच्या घरातून तब्बल १३ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसंतराव जाधव हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते पत्नीसमवेत विलासपूर येथे राहतात. त्यांची मुले पुणे येथे नोकरीला आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तेरा तोळ्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी चोरली. त्याच वेळी जाधव यांना जाग आली, त्यांनी आरडाओरड केला तसेच चोरट्यांना शिवीगाळ केली; मात्र भीतीने ते पुढे गेले नाहीत. अखेर चोरट्यांनी ऐवज घेऊन पलायन केले.

दरम्यान सकाळी त्यांनी हा प्रकार आपल्या पुणे येथे राहणाºया मुलांना सांगितला. मुले तत्काळ साताºयात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या परिसरामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडतात का? हे पोलिसांनी पाहिले; मात्र पोलिसांना काहीही सापडले नाही. या चोरीच्या प्रकारामुळे वृद्ध दाम्पत्य दहशतीखाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.नागठाणे, अतीत येथे मटका अड्ड्यावर छापासहाजण ताब्यात : रोकडसह मोबाईल जप्तनागठाणे : सहायक पोलीस अधीक्षक कार्यालय व बोरगाव पोलिसांनी नागठाणे व अतीत (ता. सातारा) येथे संयुक्तपणे केलेल्या मटकाविरोधी कारवाईत सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात करण्यात आला. याप्रकरणी सहाजणांवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

अतीत व नागठाणे येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी व बोरगाव पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी नागठाणे येथे चौकात एका इमारतीच्या आडोश्याला कल्याण मटका घेत असताना राजेंद्र विश्वनाथ कमाने (वय ४०), अजित पोपट कमाने (वय ३३, दोघे, रा. नागठाणे, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल व १३ हजारांची रोकड असा सुमारे ५६ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दुसरी कारवाई पोलिसांनी अतीत बसस्थानकाच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये केली. या ठिकाणी रोहित सुरेश यादव (वय २२), हणमंत भिकू भोसले (वय ५८), धनंजय बाळू भोसले (वय ३२) व कृष्णा साधू मुल्ल्या (वय २८) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी, पाच मोबाईल, मटका घेण्याचे साहित्य व रोख २० हजार रुपये असा सुमारे दोन लाख तीन हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, इनायत्तुला महामुदखान मुल्ला, अंकुश रामराव यादव, चालक मनोज मोहन शिंदे व बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी