शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

कोरोनाचा कहर; जिल्ह्यात मृत्यूचे तांडव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर हळूहळू संक्रमण वाढले. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील शहरी भागात संक्रमणाचा ...

गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर हळूहळू संक्रमण वाढले. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील शहरी भागात संक्रमणाचा वेग जास्त होता. मात्र, गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यानंतर ग्रामीण भागातही त्याचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना जिल्ह्यासाठी भयावह ठरला होता. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा त्यावेळी बळी गेला होता. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर आणि यावर्षीचा जानेवारी महिना दिलासादायक ठरला. संक्रमण कित्येक पटींनी कमी झाले. बाधितांची संख्याही घटली. त्यामुळे कोरोनाची भीती कमी झाली. मात्र, जानेवारी अखेरपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि काही दिवसांतच गतवर्षीपेक्षाही बिकट परिस्थिती बनली.

फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात टप्प्या-टप्प्याने रुग्णवाढीचा वेग वाढला असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात दररोज दोन हजारांवर बाधित आढळून येत आहेत. तसेच अनेक रुग्णांचा बळीही जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह इतर आरोग्य सुविधांसाठी रुग्णांची फरपट सुरू आहे तर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावरही प्रचंड ताण आहे.

तालुका : एकूण रुग्ण : बाधित गावे : कोरोनामुक्त गावे

सातारा : २१८०० : २१० : ४०

कऱ्हाड : १४७६२ : १९० : ५५

जावली : ४८९३ : १११ : १४

खंडाळा : ५८६१ : ६३ : ०

खटाव : ७५०९ : १४० : ०

कोरेगाव : ८००७ : १६२ : ३६

माण : ६१७४ : ९६ : ५

महाबळेश्वर : ३१५८ : ८६ : १२

पाटण : ३५२० : ७० : ६६

फलटण : ११९३८ : १३५ : २८

वाई : ७२३८ : ११३ : २२

- चौकट

जिल्ह्यात मृत्यूचे तांडव

जावली - ७५

कऱ्हाड - ४१३

खंडाळा - ७८

खटाव - २३२

कोरेगांव - २२४

माण - १२८

महाबळेश्वर - २८

पाटण - ११३

फलटण - १७५

सातारा - ६९७

वाई - १७२

- चौकट

बेडचा लेखाजोखा

तालुका : एकूण बेड : ऑक्सिजन बेड

सातारा : १०८३ : ७२३

कऱ्हाड : ७१० : ४६०

वाई : २४३ : १८३

पाटण : १६१ : १३५

कोरेगाव : १८३ : १६६

खटाव : १९७ : १५१

माण : १०५ : ८८

फलटण : ३३६ : २८०

जावळी : ३० : ३०

महाबळेश्वर : ७४ : ६०

खंडाळा : २०९ : १८८

- चौकट

सातारा, कऱ्हाडवर ताण

जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कऱ्हाड व सातारा शहरातील आरोग्य यंत्रणेवर वाढत्या रुग्णसंख्येचा प्रचंड ताण आहे. या दोन्ही शहरांत कोरोना रुग्णालयांची संख्या जास्त आहे तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसह आयसीयू बेडही जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील तीव्र लक्षणे असलेले रुग्ण या दोन्ही शहरांतील रुग्णालयांमध्ये अ‍ॅडमिट केले जात आहेत.

- चौकट

माण, खटाव दुष्काळी...

पाटण, महाबळेश्वर दुर्गम

जिल्ह्यांतील माण आणि खटाव हे दोन्ही तालुके दुष्काळी आहेत तर पाटण व महाबळेश्वर तालुक्यात दुर्गम भाग जास्त आहे. त्यामुळे या चार तालुक्यांत पुरेशी आरोग्य व्यवस्था नाही. सातारा व कऱ्हाडवगळता इतर तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे.