शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

साताऱ्यात बुधवार नाका अन् बोगद्याचे वैर पुन्हा धुमसतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 18:26 IST

Crimenews Satara : सातारा शहरामध्ये गत काही वर्षांपासून टोळीयुद्धाने पूर्णविराम घेतला असतानाच आता पुन्हा एका बोगदा परिसरातील मुले आणि बुधवार नाक्यावरील मुलांमध्ये वैर धुमसू लागलंय. एकमेकांच्या संगतीत असलेल्यांना हेरून मारलं जात असल्याचे समोर येत आहे. भविष्यात मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच पोलिसांनी संबंधितांवर कारवाइ करणे गरजेच आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात बुधवार नाका अन् बोगद्याचे वैर पुन्हा धुमसतंय!एकमेकांना हेरून मारलं जातंय; अनर्थ घडण्यापूर्वीच पोलिसांकडून कारवाइची गरज

सातारा : शहरामध्ये गत काही वर्षांपासून टोळीयुद्धाने पूर्णविराम घेतला असतानाच आता पुन्हा एका बोगदा परिसरातील मुले आणि बुधवार नाक्यावरील मुलांमध्ये वैर धुमसू लागलंय. एकमेकांच्या संगतीत असलेल्यांना हेरून मारलं जात असल्याचे समोर येत आहे. भविष्यात मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच पोलिसांनी संबंधितांवर कारवाइ करणे गरजेच आहे.गेल्या सहा महिन्यांपूर्वी राजवाड्यावर बोगद्यातील युवकाला बुधवार नाका परिसरातील मुलांनी पकडून कोयत्याने वार केले होते. यामध्ये संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्या दिवसांपासून बोगदा आणि बुधवार नाका, अस वैरचं सुरू झालं. अधून मधून या मुलांची शाब्दीक चकमक आणि मारामारी होऊ लागलीय. गत काही दिवसांपासून या दोन्ही गटांतील धुसफूस कमी झाली असतानाच आता दोन दिवसांपूर्वी मयूर मधूकर जाधव (वय १९, रा. कोडोली, सातारा) या युवकाला बोगदा परिसरातील चौघांनी बेदम मारहाण केली. कारण काय तर तू बुधवार नाक्यावरील मुलांसोबत फिरतोस. हेच मयूरला मारहाणीच कारण ठरलं.

मयूर हा मित्रांसोबत कारने कासला निघाला होता. मित्रांच्या कारमध्ये मयूर नेहमी असतो, हे माहित असलेल्या बोगद्यातील युवकांनी पावर हाऊसजवळ त्यांची कार आडवली. कारमधून बाहेर ओढून मयूरला त्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर संबंधित मुले तेथून पसार झाली.

मयूरला मारताना ते एकमेकांची नावे घेऊन मयूरला मार असं सांगत होते. त्यामुळे मयूरला त्यांची नावे समजली. त्यानंतर त्याने शाहूपुरी पोलिसांना नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी संदीप पवार, छोट्या पवार, ओंकार नलवडे, क्षितीज पवार (सर्व रा. मंगळवार पेठ, बोगदा परिसर सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातील काहीजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दोन्ही गटांवर पोलिसांचा हवा कटाक्ष..बुधवार नाका आणि बोगदा परिसरातील युवकांमध्ये अजूनही धूसफूस सुरूच आहे. पोलिसांनी या वादाच्या निमित्ताने तरी लक्ष घालून पूर्वीच्या वादावर तोडगा काढावा. अन्यथा या दोन्ही गटातील वैर एखाद्याच्या जीवघेण्या हल्लयापर्यंत जाइल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस