शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खटाव परिसरातील शिवारात गहू मळणीसाठी हार्वेस्ट मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 12:53 IST

सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. खटावमध्ये रब्बी ज्वारीबरोबरच गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू आहे. गव्हाची सुगी झटपट घरी नेण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

ठळक मुद्देखटाव परिसरातील शिवारात गहू मळणीसाठी हार्वेस्ट मशीनलगबग सुरू : कमी वेळेत कामाची उरकमजुरांच्या वाढत्या तुटवड्यावर पर्याय

खटाव : सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. खटावमध्ये रब्बी ज्वारीबरोबरच गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू आहे. गव्हाची सुगी झटपट घरी नेण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता लगबग सुगी उरकणाऱ्या मशीनचा वापर करताना दिसून येत आहे. पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरीता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्ट मशीनने ते केवळ एका तासाभरात होऊ लागले.

त्यामुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीतकमी वेळात पिकांची मळणी करुन घरी धान्य आणण्याच्या गडबडीत आहेत. या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाल्याने शेतकरी या यंत्राच्या सहाय्यानेच गहु काढत आहे.एक एकराचे काम अर्धा तासातमजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हार्वेस्ट मशीनने मळणी करणे अधिक सोयीचे वाटते. पारंपरिक पध्दतीने गहु काढावयाचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर लागतात. त्यांना गहू काढणीसाठी दिड पायली म्हणजेच साडेसात किलो गहू द्यावा लागतो. तसेच हा गहू मळण्याकरीता एका पोत्याला तीनशे रुपये प्रमाणे दर आहे.

हा गहू मळणीकरीता लागणारे मजुरांची मजुरी वेगळीच असते. यामध्ये सुगीपुर्ण होण्याकरीता काही दिवस लागतात. परंतु गहु काढण्याच्या या हार्वेस्ट मशीनमुळे शेतकऱ्याला आता सुगी झटपट उरकता येऊ लागली. एकरी बावीसशे रुपये दर देऊन पीक काढत असताना एकएकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होतो.

पैशाची बचतही होत असल्याने आता आम्ही शेतकरी या मशीनने मळणी करणे पसंत करत आहोत, असे मत खटाव येथील शेतकरी शंकर घाडगे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी