हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आनंदराव पाटील यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:59+5:302021-06-05T04:27:59+5:30
कऱ्हाड : माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील मराठा आरक्षणासंदर्भात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी माजी आमदार ...

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आनंदराव पाटील यांची भेट
कऱ्हाड : माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील मराठा आरक्षणासंदर्भात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी माजी आमदार आनंदराव पाटील यांची विजयनगर येथील पार्वती मंगल कार्यालयात भेट घेतली. या भेटीवेळी मराठा आरक्षणासह विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याने पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी हर्षवर्धन पाटील हेही पुढे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी विविध पक्षीय नेतेमंडळींशी चर्चा सुरू केली आहे. गेले दोन दिवस ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. त्यासह विविध नेत्यांना ते भेटत आहेत. बुधवारी त्यांनी आनंदराव पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. हे आरक्षण मिळताना अन्य जातीवर अन्याय न होता आरक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या दृष्टीने दोघांमध्ये चर्चा झाली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, विजयनगरचे सरपंच संजय शिल्वांत, मुंढेचे माजी सरपंच दाजी जमाले, रमेश लवटे, निसार मुल्ला, प्रतापसिंह पाटील, आर. टी. स्वामी, भीमराव जमाले, पांडुरंग वाघमारे, रुपेश वाघमारे, राहुल जमाले, राहुल लोंढे, अशोक माळी, उद्योजक प्रमोद पाटील, बेलवडे बुद्रुकचे माजी सरपंच सचिन मोहिते, इंद्रजित भोपते, अर्जुन हुबाले, आबासाहेब पाटील, विश्वास पाटील व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.