कठोर परिश्रमाने यश हमखास : केतन करंजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:14+5:302021-02-05T09:18:14+5:30
कुडाळ : ‘जावळी तालुक्यातील पहिली महिला सैनिक होण्याचा मान शिल्पा चिकणेने मिळवला असून, तिच्यासारखे कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली ...

कठोर परिश्रमाने यश हमखास : केतन करंजे
कुडाळ : ‘जावळी तालुक्यातील पहिली महिला सैनिक होण्याचा मान शिल्पा चिकणेने मिळवला असून, तिच्यासारखे कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर यश हमखास मिळते. आपणही कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे,’ असे प्रतिपादन फौजी ब्रदर्स ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक केतन करंजे यांनी केले.
फौजी ब्रदर्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सैन्यात भरती झाल्याबद्दल गांजे येथील शिल्पा चिकणे या जावळीच्या रणरागिणीचा गांजे येथे सन्मान करण्यात आला. यावेळी करंजे बोलत होते. या कार्यक्रमाला फौजी ब्रदर्स ग्रुपचे सुरज शिंदे, तुषार जायगुडे, सुरज तांबे, सागर निकम आदी उपस्थित होते.
कोट:
फौजी ब्रदर्स ग्रुपने मला सन्मानित केल्याने मी भारावून गेले आहे. सैन्य दलात जायचेच, हे ध्येय आयुष्यात ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे मला यश मिळाले.
-शिल्पा चिकणे, गांजे