परिश्रम हा यशाचा कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:07+5:302021-08-28T04:43:07+5:30
कऱ्हाड : परिश्रम हा यशाचा कानमंत्र असून विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करून यश मिळवावे, असे प्रतिपादन ...

परिश्रम हा यशाचा कानमंत्र
कऱ्हाड : परिश्रम हा यशाचा कानमंत्र असून विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करून यश मिळवावे, असे प्रतिपादन जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय कुराडे यांनी केले.
जिजामातानगर-विमानतळ, ता. कऱ्हाड येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. ट्रस्टचे सचिव भीमराव हादगे, उपाध्यक्ष अभयसिंह पाटील, दिलीप जानुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दत्तात्रय कुराडे म्हणाले, कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. प्रत्येकाला या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागला. शैक्षणिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर बदल झाला. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्ययन करावे लागले. मात्र, तरीही अनेक विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शाळा व गावाचा लौकिक वाढविला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सर्व संकटांवर मात करीत असतानाच प्रामाणिक प्रयत्न करून यशाची उंचच उंच शिखरे पादाक्रांत करावीत.
दरम्यान, यावेळी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच जिजामातानगरच्या प्राथमिक शाळेतील पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अशोकराव माने यांची मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
फोटो : २८केआरडी०२
कॅप्शन : जिजामातानगर-विमानतळ, ता. कऱ्हाड येथे जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.