अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST2021-04-06T04:39:16+5:302021-04-06T04:39:16+5:30
दिनेश मोहन पवार (वय २५, रा. बिबी, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी
दिनेश मोहन पवार (वय २५, रा. बिबी, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिला जबरदस्तीने शेतात आडबाजूला ओढत नेले. त्याठिकाणी मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीला घरी गेल्यावर त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. मुलीवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आल्यावर आरोपीविरुद्ध कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, पोलीस नाईक जी. एस. हादगे, खिलारे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या खटल्याची सुनावणी कऱ्हाडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी दहा महत्त्वाचे साक्षीदार तपासले. या साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवाल महत्त्वाचा ठरला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.