शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भेळच्या गाड्यावर बालमजुरांचा छळ; साताऱ्यात तिघांवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: March 7, 2024 13:50 IST

सातारा : भेळच्या गाड्यावर १३ वर्षांच्या दोन मुलांना कामाला ठेवून त्यांचा छळ  करण्यात आला. याप्रकरणी राजस्थानातील एका व्यक्तीसह तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

सातारा : भेळच्या गाड्यावर १३ वर्षांच्या दोन मुलांना कामाला ठेवून त्यांचा छळ  करण्यात आला. याप्रकरणी राजस्थानातील एका व्यक्तीसह तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेश डांगी (रा. राजस्थान, हल्ली रा. कोंडवे पेट्रोल पंपासमोर, ता. सातारा), दीपक आणि कमलेश, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांचा साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात 'श्रीनाथ भेळ' या नावाचा गाडा आहे. या गाड्यावर त्यांनी १३ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना कामाला ठेवले होते. हा प्रकार जिल्हा बाल व संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख (रा. शाहूपुरी काॅलनी, सातारा) यांच्या निदर्शनास आला. 

यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही अल्पवयीन मुलांची चाैकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पीडित दोन्ही बालमजुरांना दररोज लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. तसेच उपाशी पोटी ठेवून शारीरिक क्षमतेपेक्षा अवजड कामे करायला लावत होते. शिळे अन्न खायला देणे तसेच त्यांची मजुरी न देणे, त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधू न देणे, अशी विविध गैरकृत्य संशयित करत होते. ही मुले १४ वर्षांच्या आतील आहेत, हे माहीत असूनही त्यांनी या बालमजुरांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले.गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा छळ सुरू होता.सातारा तालुका पोलिस ठाण्यात संशयितांवर बालकास क्रूर वागणूक देऊन त्यांचे शोषण करणे, यासह विविध कलमांन्वये बुधवारी रात्री पावणेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस