लग्नात फ्रीज दिला नाही म्हणून सुनेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST2021-07-14T04:43:29+5:302021-07-14T04:43:29+5:30

सातारा : लग्नात फ्रीज दिला नाही म्हणून तेजश्री विशाल काटे (वय २४, रा. फडतरवाडी, ता. सातारा. मूळ रा. कण्हेर ...

Harassment of the bride as she did not freeze at the wedding | लग्नात फ्रीज दिला नाही म्हणून सुनेचा छळ

लग्नात फ्रीज दिला नाही म्हणून सुनेचा छळ

सातारा : लग्नात फ्रीज दिला नाही म्हणून तेजश्री विशाल काटे (वय २४, रा. फडतरवाडी, ता. सातारा. मूळ रा. कण्हेर खेड, ता. रहिमतपूर) या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून पतीसह सहा जणांवर सातारा तालुका पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पती विशाल तानाजी काटे, सासरे तानाजी एकनाथ काटे, सासू मीना तानाजी काटे (सर्व रा. खेड, ता. सातारा), दीर गणेश तानाजी काटे, जाव सोनाली गणेश काटे, मावस सासरे शिवाजी एकनाथ काटे (रा. मुंबई, मूळ रा. कण्हेर खेड, रहिमतपूर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विवाहिता तेजश्री काटे हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नात फ्रीज दिला नाही तसेच लग्नासाठी झालेला खर्चाचे पैसे आई-वडिलांकडून घेऊन ये, गाडी घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये आदी कारणांसाठी २८ जुलै २०१७ पासून २ जुलै २०२१ पर्यंत सासरकडील संशयितांनी दहिसर मुंबई व रहिमतपूर येथे वारंवार छळ केला. या प्रकारानंतर तेजश्री काटे हिने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Harassment of the bride as she did not freeze at the wedding