कºहाडात ‘हर हर मोदी’

By Admin | Updated: May 27, 2014 01:26 IST2014-05-27T01:00:05+5:302014-05-27T01:26:02+5:30

अनुभवला शपथविधी : ३३४ किलो मिठाईचे वाटप, पडद्यावर प्रक्षेपण

Har Har Modi | कºहाडात ‘हर हर मोदी’

कºहाडात ‘हर हर मोदी’

कºहाड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोमवारी कºहाडात आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. मोठ्या पडद्यावर शपथविधी कार्यक्रम पाहण्यासाठी मोदीप्रेमींनी गर्दी केली होती. पंतप्रधानांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित शेकडो नागरिकांनी हर हर मोदीचा जोरदार जयघोष केला. कºहाडमधील चावडी चौक परिवार तसेच नगरसेवक विक्रम पावसकर मित्र मंडळातर्फे शपथविधीच्या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे पाहण्यासाठी शेकडो तरुण तसेच नागरिकांनी गर्दी केली होती. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्टÑीय लोकशाही आघाडीने ३३४ जागी विजय मिळविल्यामुळे चावडी चौक मित्र परिवारातर्फे ३३४ किलो मिठाईचे वाटप केले. पडद्यावर शपथविधीचा कार्यक्रम सुरूअसताना रस्त्यावरुन येणाजाणार्‍यांना मिठाईचे वाटप केले जात होते. विशेष म्हणजे शपथविधीचा जल्लोष साजरा करणार्‍यांमध्ये भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांचे कार्यकर्तेही दिसून येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रीतिसंगम घाटावरही मोठा पडदा लावून इंटरनेटच्या सह्यााने शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करण्यात आली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Har Har Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.