टपालाला यंदा शुभ दिवाळी

By Admin | Updated: November 12, 2015 00:04 IST2015-11-11T20:30:40+5:302015-11-12T00:04:04+5:30

ग्राहक आकर्षित : गतवर्षीच्या तुलनेत शुभेच्छा कार्डांत २५ टक्के वाढ

Happy Diwali to this day! | टपालाला यंदा शुभ दिवाळी

टपालाला यंदा शुभ दिवाळी

सातारा : टपाल व्यवस्थेची सुरुवात १७ व्या शतकात झाली असली तरी आजच्या मितीला या सेवेतही मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. गत काही वर्षांत मोबाईल आल्यापासून या सेवेत मोठा परिणाम दिसून येत असला तरी यंदाच्या दिवाळीत शुभेच्छा कार्डांचे प्रमाण वाढल्याने पुन्हा एकदा ग्राहकांचा विश्वास टपाल खात्याकडे आकर्षित झाला असून, यंदाची दिवाळी टपाल खात्याला शुभ दिवाळीच झाली आहे.आधुनिक यांत्रिक युगात स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकला फार मोठं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे एखादा शुभेच्छा संदेश देण्यासाठी या सेवेचा मोठा वापर होतो, यामुळे टपाला सेवेला याचा मोठा फटका बसला आहे. परंतु सध्या दिवाळी सुरू असल्याने पोस्टाची आर्थिक आवक वाढली आहे. इंटरनेटच्या आधुनिक युगातही परंपरागत पोस्ट खात्याने आपल्या सेवेच्या बळावर ग्राहकांना आपल्याजवळ केल्याचे स्पष्ट या दिवाळीतील भेटकार्ड पाहिल्यावर होत आहे.
पोस्ट खात्यातून मासिके, बँक, आरटीओ, एलआयसी तसेच विविध शासकीय कार्यालयांचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात; परंतु दिवाळीतील भाऊबीज, पाडवाची भेटवस्तू व शुभेच्छा कार्डासाठी खासगी सेवेपेक्षा पोस्ट आॅफिसला यंदाही मागणी वाढली आहे, त्यामुळे स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आवाहन या खात्यासमोर असताना ग्राहकांना विश्वास देखील ठेवण्यात यशस्वी होत असल्याचे उदाहरण म्हणजेच यंदाच्या दिवाळीला नागरिकांनी दाखविलेला विश्वास म्हणावा लागेल. त्यामुळे
ही दिवाळी सातारा पोस्ट कार्यालयासाठी शुभ दिवाळीच मानावी लागेल. (प्रतिनिधी)

Web Title: Happy Diwali to this day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.