शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

शेतक ऱ्यांच्या हाती ज्वारीऐवजी बाटूक!

By admin | Updated: January 13, 2016 22:28 IST

रब्बी हंगामसुद्धा वाया : दुष्काळी भागातील स्थिती; चार वर्षांपासून निसर्गाची बळीराजावर अवकृपा

कातरखटाव : खटाव तालुक्यासह जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाईमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा यासारखी पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. पाणीटंचाईमुळे या भागात ज्वारीची पेर ५० टक्केच झाली होती. ज्वारीला शेवटपर्यंत पाणी पुरत नसल्यामुळे या भागातील श्ोतक ऱ्यांच्या हाती ‘ज्वारीऐवजी बाटूक’ पदरात घेण्याची वेळ आली आहे. गेल्या चार वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. दुष्काळीपट्ट्यातील या शेतक ऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीचं पीक भरघोस पदरात घेण्यासाठी बँकाचे कर्ज काढूून, उसनवारी पैसे घेऊन प्रयत्न सुरू केले होते. मात्र पीक जोमात डोलत असताना शेवटच्या टप्प्यात ते वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे. पिकांना पाणीच पुरत नाही. त्यातच डोळ्यांसमोर पीक करपू लागल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगाम वाया गेलाच आहे, आता रब्बीचा हंगामही त्याच मार्गाने जाण्याची चिन्हे बळीराजाला दिसू लागली आहेत. काही भाग वगळता बोअर, विहिरी, बंधारे, कोरडे पडले आहेत. ज्वारीला कमीत कमी चार पाणी द्यावी लागतात. या भागात तिसरंही पाणी ज्वारीला फिरलं नाही. त्यामुळे शेतऱ्यांच्या घरातज्वारीचं पीक येण्याऐवजी कडब्याच्या पेंड्यावर समाधान मानावे लागत आहे. अंतिम टप्प्यात गव्हाची पेर काही प्रमाणात झाली होती; पंरतु यंदा जमिनीत ओल नसतानाही या भागातील शेतक ऱ्यांनी ज्वारी, गहू, पेरणी केली; पण भीषण पाणीटंचाईमुळे पिकांची वाढच खुंटली आहे. जमिनीला भेगा पडायला लागल्याने ज्वारीच्या पिकाचीही वाढ थांबली आहे. परिणामी उत्पादनातही घट होणार आहे. येथील शेतकऱ्यांना आता बाटुकावर समाधान मानावे लागणार आहे. खरिपापाठोपाठ रबीचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) शेजारच्या शिवारात पाणी आलंय... कातरखटाव गाव उरमोडी व तारळी पाणलोट क्षेत्रात येत आहे. बोंबाळे बोगद्यापासून तारळी प्रकल्प चालू होत आहे. कातरखटाव हे कायम अवर्षणग्रस्त असून, दुष्काळी पट्ट्यात येत आहे. इथूून पुढे उन्हाळ्यात या गावासह परिसरात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे शेजारच्या शिवारात उरमोडीचं पाणी आलंय आमच्या शिवारात का नाही, यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी व लाभधारकांनी पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून एकमत दिसून येणं खरं गरजेचं आहे.