एसटीचालकाकडे रुमाल; वाहकांना मास्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:07+5:302021-02-06T05:15:07+5:30
सातारा : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. एसटीवर तशी जाहिरात केली आहे. बसस्थानकात येणारे चालक-वाहक काळजी घेताना ...

एसटीचालकाकडे रुमाल; वाहकांना मास्क!
सातारा : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. एसटीवर तशी जाहिरात केली आहे. बसस्थानकात येणारे चालक-वाहक काळजी घेताना दिसतात. चालकांना गाडी चालविताना गरम होत असल्याने ते रुमाल बांधतात. वाहकांचा प्रवाशांची संबंध येत असल्याने ते मास्कचा वापर सतत करतात. याउलट प्रवाशांना मात्र मास्कचे वावडे असल्याचे जाणवत आहे.
बहुतांश एसटीवर ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ या आशयाची जाहिरात लावली आहे. तरीही, बहुतांश प्रवासी मास्क केवळ नावापुरता बांधत असतात. एसटीत चालक-वाहकांनी हटकले तर ‘लावतो की, आताच काढलाय...’, किंवा ‘गरम किती होतंय... मास्क कसा लावायचा...’ असे प्रत्युत्तर दिले जाते. त्यामुळे त्यांचाही नाइलाज होतो.
कोट १
कोरोना काय असतो, याबद्दल मला काहीच माहीत नाही. कोरोना कसला प्रकार आहे, त्यामुळे काय होते, ते तुम्हीच आम्हाला सांगा. मी शिरवळ येथे बाजारासाठी आलो होतो. आता गावी लुणी येथे चाललो आहे. मास्क कसला असतो, हेही मला माहीत नाही. मी आजपर्यंत कधीच तोंड झाकलेले नाही. त्यामुळे काही भीती वाटत नाही.
- बिरा केसकर, प्रवासी
लुणी, ता. खंडाळा
०५शिरवळ-एसटी
कोट ३
राज्य परिवहन महामंडळात कर्तव्य बजावत असताना वेगवेगळ्या गावांत जावे लागते. अनेक प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे मास्कचा वापर पूर्वीपासून करत असतो. मात्र, गरमही जास्त होत असल्याने रुमाल तरी बांधावाच लागतो. प्रवाशांनीही मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा, सर्वांसाठीच ते धोक्याचे आहे.
- सुशांत माने, चालक
०५एसटी ड्रायव्हर