दरेकरसह हस्तक गजाआड

By Admin | Updated: June 17, 2014 00:46 IST2014-06-17T00:34:42+5:302014-06-17T00:46:21+5:30

लाच प्रकरण : न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Handcarriage with Darekar | दरेकरसह हस्तक गजाआड

दरेकरसह हस्तक गजाआड

सातारा : तक्रारदाराच्या वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देत हस्तकामार्फत ७० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकरसह त्याच्या हस्तकाला आज, सोमवारी पोलिसांनी अटक केली.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा न्यायालयात सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकर आणि त्याचा हस्तक दिगंबर सदाशिव धावरे (वय ३०, रा. खेड, ता. सातारा) या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. आज न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. यापूर्वी विजय शंकर साळुंखे (रा. सातारा) याला अटक केली होती.
दरेकरने दिगंबर आणि विजय या दोघा हस्तकांमार्फत ७० हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरामध्ये सापळा लावून लाचलुचपत विभागाने विजय साळुंखेला लाच घेताना पकडले होते. यानंतर गोरख दरेकर फरार होता. काही दिवसांनंतर त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने दरेकरला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Handcarriage with Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.