जिल्ह्यातील कोरोनाचे अर्धे रुग्ण सातारा, कऱ्हाड अन् फलटणमध्ये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST2021-05-14T04:38:49+5:302021-05-14T04:38:49+5:30

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून, आतापर्यंत १ लाख ३१ हजार रुग्ण आढळलेत. यामधील सर्वाधिक २९ ...

Half of the corona patients in the district are in Satara, Karhad and Phaltan. | जिल्ह्यातील कोरोनाचे अर्धे रुग्ण सातारा, कऱ्हाड अन् फलटणमध्ये..

जिल्ह्यातील कोरोनाचे अर्धे रुग्ण सातारा, कऱ्हाड अन् फलटणमध्ये..

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून, आतापर्यंत १ लाख ३१ हजार रुग्ण आढळलेत. यामधील सर्वाधिक २९ हजारांवर रुग्णांची नोंद ही सातारा तालुक्यात आहे. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. असे असलेतरी जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड अन् फलटण या तीन तालुक्यात अर्धी रुग्ण व मृतांची संख्या नोंदली गेली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर दररोज कोरोनाचे रुग्ण ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून आले. मात्र, आता मार्च महिना सुरू झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, तर एप्रिल आणि मे महिन्यांत तर कोरोनाचा विस्फोट झाला. दिवसाला दोन हजारांच्यावर रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्याचबरोबर कोरोनाने बळी पडणाऱ्यांचा आकडाही वाढला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात १ लाख ३१ हजार १९९ रुग्णसंख्या नोंद झाली आहे. यामधील २८,९५० कोरोना रुग्ण हे एका सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत, तर यानंतर कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या १८,७९५ झाली आहे. तर तीन नंबरवर फलटण तालुका असून, १७,१७१ बाधित समोर आले आहेत. इतर तालुक्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पण, सातारा, कऱ्हाड आणि फलटण तालुक्यांत जिल्ह्यात आढळलेल्यांपैकी निम्मे रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ३०३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील १६०८ मृत्यू हे या तीन तालुक्यांतच आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यातील स्थिती चिंताजनक अशीच आहे.

चौकट :

तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी

तालुका बाधित मृत

सातारा - २८९५० ८६४

कऱ्हाड - १८७९५ ५२५

फलटण - १७१७१ २१९

कोरेगाव - ११०१७ २६८

वाई - ९५११ २५४

खटाव - ११३०१ ३०८

खंडाळा - ८०२२ १०३

जावळी - ६१४८ १३२

माण - ८६२२ १६८

पाटण - ५२९५ १३२

महाबळेश्वर - ३५६८ ४०

इतर ठिकाणचे - ७३४ ...

.....................................................

Web Title: Half of the corona patients in the district are in Satara, Karhad and Phaltan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.