शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सातारा शहराला वळवाने झोडपले! अर्धा तास बॅटिंग; वीजपुरवठा खंडित, रस्त्यावरून पाण्याचे लोट, बाजारकरूची धावपळ 

By नितीन काळेल | Updated: May 7, 2023 17:51 IST

पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  

सातारा : सातारा शहर आणि परिसराला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. ढगांच्या गडगडाटात जवळपास अर्धा तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.    सातारा शहरात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली गेली. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झाली होती. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार व्हायचे. तसेच पाऊसही पडत गेला. तीन आठवड्यांपूर्वी काही दिवस पाऊस झाला. यामुळे शहराचा पारा कमी झाला होता. मात्र, मागील पाच दिवसापासून कमाल तापमान पुन्हा वाढू लागलेले.  त्याचबरोबर उन्हाच्या झला चांगल्या जाणवत होत्या. उकाडाही वाढला होता. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. रविवारी सकाळी तर प्रचंड उकाडा जाणवत होता. वारे शांत होते. यामुळे पाऊस होणार असे चित्र निर्माण झालेले. दुपारी एकनंतर तर ढगाळ वातावरण तयार झाले. सातारा शहर आणि परिसरात दुपारी दोनच्या सुमारास अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. दुपारी तीनच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट सुरू झाला. पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले.  त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली.  छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस