शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गुरूकुल अन् अपशिंगे शाळा जिल्ह्यात अव्वल, जिल्हास्तराचा निकाल जाहीर 

By प्रगती पाटील | Updated: February 24, 2024 21:45 IST

माझी शाळा स्वच्छ शाळा विभागासाठी समितीकडून शनिवारी पाहणी

सातारा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हास्तराचे निकाल जाहीर झाले आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरूकुल स्कुल आणि शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांनी बाजी मारली. या दोन्ही शाळांची विभागासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या समितीकडून शनिवारी चार तासांची पाहणीही पूर्ण झाली आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निकालांची घोषणा करण्यात आली. या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदींची तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो शाळांमधून खासगी ९ आणि सरकारी ९ शाळांची निवड तालुकास्तरासाठी करण्यात आली होती. यातील प्रत्येकी एक शाळा जिल्ह्यातून विभागासाठी पाठविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातून गुरूकुल स्कुल आणि जिल्हा परिषद शाळा अपशिंगे या शाळांची विभागासाठी निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यातून हजारो शाळांना मागे टाकून गुरूकुल स्कुलने मिळविलेले यश हे पालकांच्या विश्वासाचे आणि शाळेतील प्रत्येक घटकाच्या कष्टाचे फलीत आहे. जे नवे ते हवे असं म्हणत नवनवीन संकल्पना राबवित शाळेचे मार्गक्रमण सुरू आहे. विभागीय पातळीवरही सातारा जिल्ह्याचे नाव उंचविण्यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.- राजेंद्र चोरगे, गुरूकुल स्कुल 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण