शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

गुरुजींवरच्या विनोदाला गुरूजनांची मनापासून दाद!

By admin | Updated: July 19, 2016 00:17 IST

गुरुपौर्णिमेनिमित्त खास कार्यक्रम : सासू सुनेच्या शाब्दिक जुगलबंदीत सापडली शिक्षकांचीही रास

सातारा : खास गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकवृंदांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुनेच्या राशीला सासू’ या कार्यक्रमास गुरूजनांनी तुडुंब गर्दी केली. शाहू कला मंदिरच्या ‘हाऊसफुल्ल’ सोहळ्यात रंगमंचावरील कलाकारांनी शिक्षकांवर केलेल्या ऐनवेळच्या अनेक विनोदांना प्रेक्षकांनीही मनापासून दाद दिली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कृपा हेअर टॉनिक आणि कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनी स्वीकारले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, चरक एजन्सीचे शंतनू भोईटे, कृपा हेअर टॉनिकचे संचालक चंदन दळी, केआरए ज्वेलर्सचे आकाश शेळके, कार्यकारी निर्माता विनय म्हसवेकर, प्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.लग्न जुळविताना मुला-मुलीची पत्रिका जुळते का ते पाहतात; परंतु या नाटकामध्ये सासूची पत्रिका सुनेबरोबर जुळते का? याची मांडणी केली आहे. वृश्चिक राशीच्या सासूला कोणत्या राशीची सून सूट होईल, यासाठी ही सासू बारा राशींच्या सुनांची संसार पाहते. यावेळी सासू सुनेच्या संवादात तुफान विनोदी हास्य शिक्षकांना खिळवून ठेवत होते. सासू-सुनांचे नातेसंबंध आणि त्याला राशीची जोड या विषयावरचे हे तीनपात्री नाटक पाहण्यासाठी सभागृह खचाखच भरले होते. सासू-सुनांमध्ये होणारे वाद-संवाद त्याचे स्वरूप एकमेकींच्या राशीप्रमाणे कसे बदलतात, याचे चित्रण या नाटकात मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले होते. नाटकाच्या शेवटपर्यंत निखळ मनोरंजनाबरोबर हास्याचे फवारे उडत होते. आनंद म्हसवेकर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक अभिनेत्री नयना आपटे, अभिनेत्री योगिनी पोफळे व अभिनेते मनोहर सोमण यांनी बारा राशींच्या बारा सासू आणि तितक्याच सुनांचे स्वभाव उलगडून दाखविताना त्यातील बहुतांशी प्रसंग धम्माल विनोदी केले आहेत. कृपा हेअर टॉनिकची माहिती वर्षा गाडगीळ यांनी तर केआरए ज्वेलर्समधील दागिने व विविध योजनांची माहिती आकाश शेळके यांनी दिली. (प्रतिनिधी)भाग्यवान विजेते जाहीरउपस्थित शिक्षकांमधून तीन भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये गवडी शाळेतील एस. जे. कदम, डॉ. जे. डब्ल्यू आलियन अ‍ॅकॅडमीचे धनंजय जाधव, पोदार स्कूलच्या प्रिया जगताप यांना ‘लोकमत’तर्फे सुवर्णनथ देण्यात आली. तर कृपा हेअर टॉनिकतर्फे दिलेली पैठणी तेजस्विनी मायने तर गीतांजली शिंदे साडीचे मानकरी ठरल्या.बालविकास मंच सभासद नोंदणीला प्रारंभ‘लोकमत’ बालविकास मंचची सभासद नोंदणी सुरू झाली असून, नोंदणी शुल्क १५० रुपये आहे. यामध्ये सभासदांना आकर्षक भेटवस्तू, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावेळी सभासद नोंदणी भेटवस्तूचे अनावरण करण्यात आले.