भरवर्गात गुरूजींना सोशल मिडीयाचे वेड!

By Admin | Updated: July 14, 2015 21:26 IST2015-07-14T21:26:28+5:302015-07-14T21:26:28+5:30

शाळांतील स्थिती : ज्ञानदान करतानाच खणाणतोय मोबाईल; आदेशाची पायमल्ली

Guruji social media craze in the recruitment! | भरवर्गात गुरूजींना सोशल मिडीयाचे वेड!

भरवर्गात गुरूजींना सोशल मिडीयाचे वेड!

कऱ्हाड : शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातून आलेला ताजा भाजीपाला विकत घ्यावा यासाठी पालिकेने शहरात तीन ठिकाणी भाजी मंडई बांधली. त्यातून शेतकरी दररोज आपल्या शेती मालाची विक्री करू लागला. भाजी विक्रेत्यांनी पालिकेने एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गंत १९८४ साली बांधलेल्या संभाजी भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करण्यास विरोध दर्शवत पुन्हा आपल्या शेतीमालाची विक्री गुजर हॉस्पीटल परिसरातील रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेत शेतकरी बसू लागले आहेत. त्यामुळे एकीकडे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले संभाजी भाजी मार्केट ओस पडून राहत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून आपला शेतीमाल विकत असल्याने वाहतूक कोंडींसारख्या समस्या उद्भवत आहेत. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी भाजी मार्केटला समांतर पर्याय म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने छत्रपती संभाजी मार्केट बांधून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी सोय केली. त्यातून सुरूवातीला भाजीमार्केट चांगले चालले. नंतर मात्र, या ठिकाणी धंदा होत नसल्याने भाजी विके्रत्यांनी पाठ फिरवल्याने हे मार्केट कायमचे बंद झाले. पालिकेने जवळपास तीनवेळा हे मार्केट सुरू करण्याचा प्रयत्नही केला पण त्यास यश आले नाही. मात्र, प्रत्येकवेळी असाच प्रकार घडत असल्याने पालिकेने केलेला खर्च हा ‘क चऱ्यात ’ गेला आहे.
संभाजी मार्केट सुरू ठेवण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर अनेकवेळा पालिकेने कारवाईचा बडगाही उगारला. पालिकेने भाजी विक्रेत्यांवर सक्ती करत त्यांनी आपला शेतीमाल प्रत्येक रविवार व गुरूवारी बाजाराच्या दिवशी संभाजी भाजी मार्केटमध्येच बसून विकावा अशा सुचना केल्या. त्यासाठी पूर्वीच्या जागी भाजी विक्रेत्यांचे गाडे, ठिकाण हे उद्वस्थही केले. त्यानंतर थोडी दिवस शेतकरीही या ठिकाणी बसून आपला शेती माल विकू लागले. मात्र, आता याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत.
पालिकेने नवीन बांधलेली भाजी मंडई इमारत अपुरी पडत असून त्या ठिकाणी अद्यापही काही सोयी उभारण्यात आल्या नाहीत. संभाजी मार्केट या ठिकाणीही अशाच प्रकारची गैरसोय शेतकऱ्यांची होत असल्याने या ठिकाणी आपला धंदा ही होत नसून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी न बसण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी पुन्हा गुजर हॉस्पीटल परिसरात बसून आपला भाजीविक्रीचा धंदा सुरू केला आहे.
भाजी मंडईमध्ये साचत असलेल्या कचऱ्यापासून अनेक आजारांचा फैलाव होत आहे. ताजा माल असूनही भाज्यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे व जवळच्या कचऱ्यामुळे आजार होण्याच्या भितीने नागरिकांकडून भाजी खरेदी केला जात नाही. त्याचा तोटा शेतकरी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. पालिका अन् शेतकरी यांच्यातील वादामुळे भाजी मार्केटचा प्रश्न मात्र अजूनही अधांतरी आहे. भाजी मार्के टमध्ये सर्व सुविधा उभारल्या असल्याचे पालिका सांगत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी आपला धंदा होत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बसण्यास नकार दिला आहे. (प्रतिनिधी)

इमारतीत व्यवसाय होत नाही
पालिकेच्या संभाजी भाजी मार्केटमध्ये इमातीमध्ये लोक येत नाहीत. तसेच होलसेल भावाने मालाची विक्री काही विक्रेत्यांकडून केली जात असल्याने दिवसाला दहा किलोही माल इमारतीमध्ये बसल्यावर विकला जात नाही. त्यामुळे बाहेर बसावे लागते, अशी प्रतिक्रिया टेंभूतील एका शेतकरी विक्रेत्याने दिली. मात्र, संबंधित विक्रेत्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.

Web Title: Guruji social media craze in the recruitment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.