शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीत 'गुरुजन एकते'चा विजय!, संभाजीराव थोरातांच्या नेतृत्वाखालील पँनेलची बाजी

By प्रमोद सुकरे | Updated: January 2, 2023 19:29 IST

गेले अनेक दिवस लांबली होती निवडणूक

कराड : गेले अनेक दिवस लांबलेल्या कराड - पाटण तालुका शिक्षक सोसायटीची निवडणूक रविवारी दि.१ रोजी झाली. आज सोमवारी कराड येथे त्याची मतमोजणी झाली. सुरुवातीला मतमोजणीत अत्यंत चुरशीने दिसणारी निवडणूक अंतिमतः शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील गुरुजन एकता पॅनलने सुमारे १५० च्या वर मतांनी जिंकली. निकालानंतर विजयी पॅनेलच्या उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला.कराड- पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षक संघ, समिती व इतर अनेक शिक्षक संघटना एकत्रित करीत 'गुरुजन एकता' पॅनेल रिंगणात उतरवले. तर त्या विरोधात शिक्षक नेते दिवंगत माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना मानणाऱ्या गटाने जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक महेंद्र जानुगडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत 'गुरुमाऊली' पॅनेल रिंगणात उतरवले होते. गेले १५ दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. अखेर रविवारी मतपेटीत निकाल बंद झाला. सोमवारी निकाल जाहीर झाला. त्यात गुरुजन एकतेचाच विजय झाल्याचे स्पष्ट झाले.

 गुरुजन एकता पॅनलचे विजयी उमेदवार :- भारत मारुती देवकांत, महादेव धनाजी दडस ,वनिता बजरंग अपशिंगे ,संतोष संपतराव यादव, दत्तात्रेय दादाराव जाधव, अंकुश बाबुराव नांगरे, प्रवीण भानुदास मोरे ,रमेश एकनाथ जाधव ,नीलम कासम नायकवडी, दिनेश दिनकर थोरात, सागर परशुराम पाटोळे, आनंदा बाळू चाळके, शशिकांत रामचंद्र तोडकर, धनाजी प्रल्हाद कोळी, रुक्मिणी मोहन सातपुते, वैशाली राजेंद्र पवार ,अनुसया दीपक पवार ,पल्लवी हनुमंत यादव

 गुरुमाऊली पॅनलचे पुरस्कृत विजयी उमेदवार:-  प्रदीप महादेव कुंभारबिनविरोध उमेदवार यापूर्वी शंकर मोहिते( ढेबेवाडी) व संदीप संकपाळ (मसूर) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ते गुरुमाऊली पॅनलचे नेतृत्व मानतात.

 दिनेश थोरात सर्वाधिक मतांनी विजयी उंडाळे गटातील उमेदवार दिनेश दिनकर थोरात यांना सर्वाधिक म्हणजे १८०० मते मिळाली. सुमारे १ हजार ५०० मताच्या फरकांने ते विजयी झाले.

शिक्षक सोसायटीच्या कारभारात चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांना सभासदांनी प्रायचित्त दिले आहे. यातून ते बोध घेतील अशी आशा आहे. नवनिर्वाचित संचालकांना माझ्या शुभेच्छा आहेत.- संभाजीराव थोरात शिक्षक नेते 

 कराड पाटण शिक्षक सोसायटी निवडणुकीत राज्यस्तरावरचे नेते व सर्व संघटना एकत्रित येऊन त्यांनी पॅनेल टाकले होते. त्यांच्या विरोधात आम्ही लढलो. मात्र आम्हाला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.  आमचे काम यापुढेही सुरूच राहील. - महेंद्र जानुगडे  संचालक, जिल्हा शिक्षक बँक (गुरुमाऊली पॅनेल) 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक