गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत गुजरवाडी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:57+5:302021-02-06T05:13:57+5:30
धामणेर : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गतवर्षी कोरेगाव तालुक्यात घेण्यात आलेल्या प्रगत व गुणवत्तापूर्ण शाळेचा निकाल व गुणगौरव ...

गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत गुजरवाडी प्रथम
धामणेर : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गतवर्षी कोरेगाव तालुक्यात घेण्यात आलेल्या प्रगत व गुणवत्तापूर्ण शाळेचा निकाल व गुणगौरव सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात झाला.
या समारंभात कोरेगाव जिल्हा परिषद शाळा गुजरवाडी (ट) चा स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, प्रमाणपत्र व पंधरा हजारांचा धनादेश देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी गोळे, संदीप शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, पंचायत समिती सदस्य, विस्ताराधिकारी व केंद्र प्रमुख आदी उपस्थित होते.