राज्याला दिशादर्शक प्रकल्प
By Admin | Updated: December 10, 2014 23:57 IST2014-12-10T21:44:15+5:302014-12-10T23:57:03+5:30
जयकुमार गोरे : स्वरूपखानवाडी येथे पाणी पूजन

राज्याला दिशादर्शक प्रकल्प
दहिवडी : माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये गेल्या साडेतीन वर्षात साकारण्यात आलेला साखळी सिमेंट बंधारे प्रकल्प, पाणलोट प्रकल्प तसेच यांत्रिकी विभागाकडुन करण्यात आलेली पाझर तलाव दुरूस्ती इथल्या जलक्रांतीला कारणीभूत ठरली. संपूर्ण राज्याला दिशादर्शक प्रकल्प माझ्या मतदारसंघात आकाराला आला. हेच धोरण राज्यात राबविणार असल्याचा मला अभिमान आहे, असे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
स्वरुपखानवाडी येथील बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, उपसरपंच बंडू कोकरे, गुलाब पिसाळ, यशवंत इंगळे प्रमुख उपस्थिती होती.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, चालु वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडुनही माण-खटाव तालुक्यातील ज्या गावांमध्ये साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या परिसरात पाणीटंचाईचे प्रमाण कमी आहे. स्वरुपखानवाडीसह अनेक बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत. बंधाऱ्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदाही होत आहे.
सर्वात मोठा पाणलोट प्रकल्पही आपल्याकडेच सुरू आहे. नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सध्याचा दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. सिमेंट बंधाऱ्याची क्रांती पहाण्यासाठी त्यांनी माण-खटावमध्ये यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)