आधुनिक शेती तरुणांसाठी दिशादर्शक : मासाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:12+5:302021-09-06T04:44:12+5:30

वाई : ‘वरखडवाडी (ता. वाई) येथील नितीन वरखडे यांनी नियोजनबद्ध शेतीचा आदर्श घेऊन भात, ज्वारी, सोयाबीन नवलौकिक ...

A guide for modern farming youth: Masalkar | आधुनिक शेती तरुणांसाठी दिशादर्शक : मासाळकर

आधुनिक शेती तरुणांसाठी दिशादर्शक : मासाळकर

googlenewsNext

वाई : ‘वरखडवाडी (ता. वाई) येथील नितीन वरखडे यांनी नियोजनबद्ध शेतीचा आदर्श घेऊन भात, ज्वारी, सोयाबीन नवलौकिक केला आहे. योग्य प्रकारे फवारणी व देखभाल करता यावी यासाठी पट्टा पद्धतीने भातशेती करून त्यांनी प्रतिगुंठा १७ किलोंचे उत्पन्न काढून सातारा जिल्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आधुनिक शेती हा प्रयोग तरुण शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे,’ असे गौरवोद्गार प्रा. एस. डी. मासाळकर यांनी काढले.

नितीन वरखडे यांनी किम्या जातीचे सोयाबीनचे वाण घेऊन मुल्चिंग पद्धतीने सोयाबीनची शेती केली. या प्रयोगाची पाहणी मासाळकर यांनी केली. यावेळी ते बोलत होते.

मासाळकर म्हणाले, ‘मलचिंग पद्धतीला पाण्याचे प्रमाण कमी लागते. रोपांची संख्या व्यवस्थित राखून ठेवता येते. प्रतिएकरात सुमारे ३८ क्विंटल उत्पन्न घेऊ शकतो. महात्मा फुले विद्यापीठामार्फत ज्वारीची फुले रेवती मलदांडी हे वाण घेऊन सुमारे प्रतिएकर चार किलो बियाणे पेरून त्यावर अझोटोबॅक्टर जीवाणूंची प्रक्रिया करून एका गुंठ्यांत ९० किलो उत्पन्न मिळवले.’

कृषी औद्यागिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिकन्या राजेश्वरी रवींद्र भिलारे हिने मार्गदर्शक सहयोगी अधिष्ठाता डॉ. मासाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील शेतकरी नितीन वरखडे यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या प्रयोगाची माहिती घेतली.

०५वाई

वरखडवाडी येथील कृषिकन्या राजेश्वरी भिलारे यांनी शेतकऱ्यांना पिकांविषयी माहिती दिली.

Web Title: A guide for modern farming youth: Masalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.