मालगावला मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:33+5:302021-08-29T04:37:33+5:30
पार्थचे यश सातारा : लोकनेते सुबराव कदम ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिकवणाऱ्या पार्थ साळुंखे याने जागतिक तिरंदाजी ...

मालगावला मार्गदर्शन
पार्थचे यश
सातारा : लोकनेते सुबराव कदम ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिकवणाऱ्या पार्थ साळुंखे याने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्याबद्दल त्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
पिके कोमेजली
सातारा : जिल्ह्यातील पश्चिमेकडील डोंगराळ भाग वगळता इतरत्र सर्वच तालुक्यांत पावसाने ओढ दिल्याने खरिपातील सोयाबीन, वाघा घेवडा, धना, बटाटा, आले, बाजरी, कडधान्ये, मका आदी पिके कडक उन्हाने कोमेजून गेली आहेत.
प्रशांत मोरे यांचा गौरव
सातारा : पवळेश्वरनगर, ता. सातारा येथील प्राथमिक शिक्षक प्रशांत मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. औरंगाबादच्या मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात लेखक डॉ. सुधीर निकम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
रॉकेल देण्याची मागणी
सातारा : ग्रामीण भागात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा सारखा लपंडाव सुरू असल्याने घरात रॉकेलच्या चिमण्यांची गरज पडू लागली आहे. मात्र, रेशनिंगवर रॉकेल वाटप होत नसल्याने अडचण होत आहे.
अझोलाविषयी मार्गदर्शन
सातारा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कऱ्हाडची कृषिकन्या अंकिता पवार हिने नागठाणे गावात शेतकऱ्यांना ‘अझोला’ याविषयी मार्गदर्शन केले.
तपासणी शिबिर
सातारा : शालेय शिक्षण विभाग, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी विद्यार्थ्यांचे ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मोजमाप तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
साताऱ्यात रक्तदान
सातारा : येथील राजधानी सातारा फाउंडेशनतर्फे रविवार पेठेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी किशोर धुमाळ, विठ्ठल शेलार, हसन तडवी, चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते.