शासकीय जमीन भोगवटाबद्दल मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:26+5:302021-02-08T04:33:26+5:30
सातारा : शासकीय जमीन भोगवटा वर्ग-२ चे रूपांतर वर्ग-१ मध्ये करण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर ...

शासकीय जमीन भोगवटाबद्दल मार्गदर्शन
सातारा : शासकीय जमीन भोगवटा वर्ग-२ चे रूपांतर वर्ग-१ मध्ये करण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत अधिकाधिक अर्ज प्रकरणे सादर करण्याचे आवाहन केले.
येथील गोडोलीमधील फॉरेस्ट कॉलनीतील दिवंगत अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनमध्ये हे मार्गदर्शन शिबिर झाले. यावेळी तहसीलदार आशा होळकर, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे, नगरभूमापनचे किरण नाईक, मंडलाधिकारी जयंत जाधव, तलाठी तारळेकर, सातारा जिल्हा गृहनिर्माण संस्थांचा सहकारी संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पारेख यांच्यासह सातारा शहरात स्थापित झालेल्या सुमारे ३० गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या मार्गदर्शन शिबिरात गृहनिर्माण संस्थांच्या वतीने उपस्थित प्रश्नांवर किरण नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रांताधिकारी मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. मागणीनुसार अन्य ठिकाणीही अशी शिबिरे घेऊ. तसेच महसूल विभागाकडून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी बाळासाहेब महामूलकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : सातारा येथील शिबिरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
...............................................