शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 19:33 IST

खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले.

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. शेतकºयांनी पालकमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल केली. पालकमंत्री शिवतारे यांच्या मंत्रालयातील दालनात शेतकºयांनी दिलेल्या निवेदनाची प्रतच सही शिक्क्यानिशी सोशल मीडियावर वायरल केली आहे.

एमआयडीसी टप्पा क्र.१, २, ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी गेल्या दहा वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तहसीलदार कार्यालय ते मुंबई मंत्रालयांवर अर्धनग्न मोर्चा काढला होता. मोर्चा मुंबई येथील मानखुर्द याठिकाणी पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार भर उन्हात अडविला. मुंबई याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त करत शेतकºयांना पुढे जाण्यापासून अडवत अकरा तासांनंतर आंदोलकांच्या सुरक्षिततेचे कारण सांगत ताब्यात घेत चेंबूर येथील एका विद्यालयामध्ये आंदोलकांना ठेवण्यात आले होते.

त्यावेळी आंदोलकांमधून एका शेतकºयाने जिल्'ाचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी बांधवांना मदत करण्याची याचना केली. पालकमंत्र्यांनी शेतकºयांना फैलावर घेत याबाबतचे निवेदन मेलद्वारे मिळाले नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे शेतकºयांनी या घटनेचा तेथेच निषेध व्यक्त केला होता.

शासनाच्या धोरणाचे वस्त्रहरण झाल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकºयांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. त्यानंतर शेतकºयांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या दाव्याची पोलखोल करत मुंबई येथील मंत्रालयात असणाºया पालकमंत्र्यांच्या दालनात खासगी सचिवांच्या सही शिक्क्यानिशी दिलेल्या निवेदनाची प्रतच शेतकºयांनी सोशल मीडियावर टाकत पालकमंत्र्यांच्या दाव्याची चिंधड्या उडवल्या आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दावा फोल ठरल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे.खंडाळा तालुक्याशी देणे-घेणे नाहीखंडाळा तालुक्यातील शेतकरी समस्या पोटतिडकीने मांडत असताना पालकमंत्री म्हणून संविधानिक जवाबदारी पार पाडणाºया विजय शिवतारे यांना शेतकºयांच्या समस्यांचे देणे-घेणे नाही. केवळ सातारा जिल्'ात पर्यटनासाठी येणाºया पालकमंत्र्यांना खंडाळा तालुक्याशी देणे-घेणे नाही. त्यांना शेतकºयांची व्यथा काय कळणार आहे, हा प्रश्न आहे शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप