पालकमंत्र्यांनी साधला मजुरांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:30+5:302021-06-16T04:50:30+5:30
मसूर : सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या व्यस्त व्यापातूनही उसाची लागण सुरू ...

पालकमंत्र्यांनी साधला मजुरांशी संवाद
मसूर : सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या व्यस्त व्यापातूनही उसाची लागण सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन तेथील मजुरांशी संवाद साधला. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले.
मंत्री बाळासाहेब पाटील यांना शेतीची आवड आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. ते राजकारण, समाजकारण करत असताना वेळ काढून नेहमी शेतीवर लक्ष देत असतात, वेळ मिळेल तसे ते आपल्या मसूर-माळवाडी येथील शेतात वारंवार जातात व तेथे आपल्या शेतीसाठी वेळ देतात. नेहमीप्रमाणे ते शेताकडे गेले असता शेतात सुरू असणाऱ्या आडसाली ऊस लागणीची पाहणी केली. या वेळी दिगंबर डांगे उपस्थित होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरिपाच्या पेरणीबरोबरच ऊस या मुख्य पिकासह भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या लागणीला सुरुवात होत असते. या पार्श्वभूमीवर रविवारी सुटीच्या दिवशी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माळवाडी-मसूर येथील शेतात आडसाली उसाची लागण सुरू आहे. त्या शेतात जाऊन ऊसलागण सुरू असताना पाहणी केली. तेथील मजुरांशी संवाद साधला, त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले.
मंत्री बाळासाहेब पाटील यांना आधुनिक शेतीची आवड असून, ते तेथे ठिबक सिंचनावर आधारित शेतीमध्ये विविध प्रयोग करत असतात व त्याची स्वत: जाऊन पाहणी करून शेती चांगली येण्यासाठी प्रयत्नशील असतात.
१४मसूर
मसूर-माळवाडी येथील शेतात आडसाली उसाच्या लागणीची पाहणी करताना मंत्री बाळासाहेब पाटील व इतर.