शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भाजपच्या गोटातील ‘कॅप्टन’ पृथ्वीबाबांच्या गटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:55 PM

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : गत पालिका निवडणुकीत इंद्रजित गुजर (कॅप्टन) अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पाठिंबा दिलेल्या आमदार बाळासाहेब पाटील पुरस्कृत लोकशाही आघाडीबरोबर पालिका सभागृहात काम करतील, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात त्यांनी भाजपच्या गोटात जाणे पसंत केले. गत महिन्यात फारूख पटवेकर यांची स्वीकृत नगरसेवक होईपर्यंत ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : गत पालिका निवडणुकीत इंद्रजित गुजर (कॅप्टन) अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पाठिंबा दिलेल्या आमदार बाळासाहेब पाटील पुरस्कृत लोकशाही आघाडीबरोबर पालिका सभागृहात काम करतील, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात त्यांनी भाजपच्या गोटात जाणे पसंत केले. गत महिन्यात फारूख पटवेकर यांची स्वीकृत नगरसेवक होईपर्यंत ते भाजपच्याच गोटात दिसत होते. गत आठ दिवसांत त्यांनी दोन ते तीन कार्यक्रमांना पृथ्वीबाबांबरोबर हजेरी लावण्याने ते काँगे्रसच्या चव्हाण गटात सहभागी झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत शहर व तालुक्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू आहे.गुजर परिवार हा मूळचा कºहाड तालुक्यातील रेठरे गावचा! पण अनेक वर्षांपासून कºहाडात स्थायिक झालाय. कºहाडच्या सार्वजनिक व वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नेहमीच योगदान राहिलंय. तर विद्यानगरी कºहाडमध्ये त्यांनी दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रुपाने भरच घातली आहे. अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर गत पालिका निवडणुकीत त्यांना राजकीय क्षेत्रातही नागरिकांनी काम करण्याची संधी दिली आहे.पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा अपक्ष म्हणून रिंगणात उतरून पराभव केला. त्यात राष्ट्रवादी पुरस्कृत लोकशाही आघाडीने येथे स्वतंत्र उमेदवार उभा न करता इंद्रजित गुजर यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला. त्यातच निकालानंतर राजेंद्र यादव समर्थकांनी स्वकीयांनीच दगा फटका केल्याने पराभव झाल्याची टीका केली. अन् त्यानंतर पालिकेच्या राजकारणात काय ‘रामायण’ घडले, हे साऱ्यांनाच माहीत आहे.राजेंद्र यादव यांचा पराभव करून ‘मेहरबान’ झालेले इंद्रजित गुजर जनशक्ती आघाडीबरोबर जाणे कठीण होते. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिलेल्या लोकशाही आघाडीबरोबर गुजर सभागृहात बसतील, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात भाजपबरोबर जाणे त्यांनी पसंत केले. भाजपचे सभागृहात चारच नगरसेवक होते. मात्र, इंद्रजित गुजर व मिनाज पटवेकर या दोन अपक्षांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच भाजपला पालिकेत स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळाली. तर एका स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी लागली.अलीकडच्या काही महिन्यांत पालिकेच्या राजकारणात भाजप अन् जनशक्ती आघाडी यांचे ‘ट्यूनिंग’ चांगलेच जमल्याचे अनेकदा दिसून आले आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या झालेल्या आढावा बैठकीला जनशक्ती, भाजपा अन् अपक्ष मिनाज पटवेकर हेही होते. मात्र, गुजर यांनी दांडी मारली होती. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानंतर ‘जनशक्ती’च्या नगरसेवकांनी त्यांचे कºहाड शहरात प्रवेशद्वारावर जंगी स्वागत केले होते. यावेळी जयवंत पाटील, राजेंद्र यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गुजर व यादव यांच्यातील विळा भोपळ्याचे सख्य आख्ख्या शहराला माहीत आहे. यादवांची भाजपशी वाढणारी सलगी गुजरांना पटणारी अन् परवडणारी नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी काँगे्रसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी स्नेह वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.