भरचौकात जमिनीतील वीजवाहिनी उघड्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:52+5:302021-09-18T04:41:52+5:30

पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) येथील छत्रपती शिवाजी चौकात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला जमिनीतून विद्युत पुरवठा करणारी वीजवाहिनी उघडी ...

Ground power lines open in Bharchowk! | भरचौकात जमिनीतील वीजवाहिनी उघड्यावर!

भरचौकात जमिनीतील वीजवाहिनी उघड्यावर!

पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) येथील छत्रपती शिवाजी चौकात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला जमिनीतून विद्युत पुरवठा करणारी वीजवाहिनी उघडी पडल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला.

येथील चौकातून दिवसभरात शेकडो वाहने ये-जा करत असतात. तसेच नागरिकांची पायी चालत मोठी वर्दळ नेहमीच असते. खासदार निधीतून या चौकात रात्रीच्यावेळी प्रकाशासाठी मोठा विद्युत खांब उभारला आहे. त्यासाठी रस्त्याच्या एका बाजूकडून चौकाच्या मध्यभागी जमिनीतून पुरून वीज वाहिनीद्वारे विद्युतपुरवठा केला आहे.

सध्या लातूर-सातारा या महामार्गाचे काम सुरू आहे. रात्रंदिवस अवजड वाहनांची ये-जा याच रस्त्याने होत असते. सततचा दाब पडून जमिनीतील वीजवाहिनी उघडी पडली होती. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, युवा नेते सुसेन जाधव, दीपक तोडकर, अमित जाधव, शहाजी देवकर यांच्या लक्षात येताच त्यांनी खटाव वीजवितरण कंपनीचे अभियंता राक्षे यांच्या निदर्शनास तातडीने आणून दिले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळता आला.

(कोट..)

भरचौकात वीजवाहिनी उघड्यावर पडली असल्याने जर एखाद्याचा नाहक बळी गेला असला तर? मग वीजवितरण अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने दुर्लक्ष केले म्हणून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का करू नये?

- प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

(कोट)

वीजवितरणाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने केबल काढून सुरक्षितरित्या पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जमिनीतून वीजपुरवठा करण्याऐवजी तात्पुरता रस्त्याकडेच्या पोलवरून हवेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकारास रस्त्याचे काम करणारा ठेकेदार ही तेवढाच जबाबदार आहे. त्याच्या अवजड यंत्रसामग्री भरलेल्या वाहनांमुळे रस्त्याची झीज होऊन केबल वर आली आहे.

- शैलेश राक्षे, अभियंता, वीजवितरण, खटाव

फोटो-

१७केशव जाधव

पुसेगाव (ता. खटाव) येथील छत्रपती शिवाजी चौकात उघड्यावर पडलेली वीजवाहिनी प्रताप जाधव, सुसेन जाधव, दीपक तोडकर, अमित जाधव वीज अभियंता शैलेश राक्षे यांच्या निदर्शनास आणून दिले. (छाया : केशव जाधव)

Web Title: Ground power lines open in Bharchowk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.