ग्रायंडरने कापली हाताची नस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:52 IST2017-08-12T13:52:00+5:302017-08-12T13:52:00+5:30
सातारा : जुनी तुळई कापत असताना ग्रायंडरने हाताची नस कापल्याने शिवाजी किसन टिंगरे (वय ४८, रा. कंरजे, सातारा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

ग्रायंडरने कापली हाताची नस !
सातारा : जुनी तुळई कापत असताना ग्रायंडरने हाताची नस कापल्याने शिवाजी किसन टिंगरे (वय ४८, रा. कंरजे, सातारा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
शिवाजी टिंगरे हे सुतार काम करतात. काळाराम मंदिर परिसरातील एका घरामध्ये ते जुनी तुळई ग्रायंडरने कापत होते. यावेळी अचानक ग्रायंडर निसटल्याने त्यांच्या उजव्या हाताची नस कापली गेली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना काही नागरिकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. नस कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. हे विदारक चित्र पाहून रुग्णालयातील कर्मचारीही भयभीत झाले होते. टिंगरे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.