शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोती चौकात तडफडणाऱ्या गाढवाला सलाईन लावून जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:58 IST

साताऱ्यातील मोती चौकातच एक गाढव फूटपाथजवळ लोळत व विव्हळत पडले होते. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच परिस्थितीत पडले होते.

सातारा : साताऱ्यातील मोती चौकातच एक गाढव फूटपाथजवळ लोळत व विव्हळत पडले होते. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच परिस्थितीत पडले होते.

काही वेळाने त्याला जागेवरून काहीच हलचाल करता येत नसल्याचे पाहून नागरिकांनी एका सामाजिक संघटनेला बोलावून त्याच्यावर तातडीने उपचार केले. त्यामुळे गाढवाला जीवदान मिळाले. प्लास्टिक खाल्ल्यामुळे या गाढवाचे पोट फुगले होते.

याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील मोती चौकात मंगळवारी सकाळी आकरा वाजल्यापासून एक गाढव विव्हळत पडले होते. याकडे सुरूवातीला फारसे कोणीच लक्ष दिले नाही. परंतु दुपारपर्यंत विव्हळने बंद झाले नसल्याने गाढवाला काही तरी गंभीर आजार झाला असल्याचा अंदाज काही नागरिकांनी लावला. त्यानंतर तेथील काही नागरिकांनी गाढवाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाढव पाणी पिले नाही.या दरम्यानच या गाढवाचे सतत पोट फुगत होते. त्यामुळे गाढव फक्त लोळतच होते. म्हणून काही नागरिकांनी प्राण्यांसाठी औषध उपचार करणाºया एका सामाजिक संस्थेला याची कल्पना दिली. त्यानंतर गाढवावर उपचार करण्यात आले.उपचार करणाºया कार्यकत्यांनी सांगितले की, गाढवाने चरताना प्लास्टिक खाल्ले असावे. त्यामुळे पोट फुगले असून, त्याच्या पोटात ते अडकून बसले असण्याची शक्यता आहे. अशा आजाराला कोलिक आजार असे म्हणतात. त्यामुळे त्याला पोटात असह्य वेदना होत होत्या. या वेदना कमी झाल्या नाही तर शक्यतो एक दिवसाच्या आत गाढव दगावू शकते. हे गाढव दोन वर्षांचे असून, त्याला चार सलाईन लावण्यात आल्याने त्याच्या वेदना कमीझाल्या आहेत. काही तासांत ते बरे होईल. काही नागरिकांच्या जागृकतेमुळे गाढवाला जीवदान मिळाले.बाजूला घेण्यासाठी कोणी आले नाही...गाढव दिसले की दोन हात लांबच राहणे नागरिक पसंत करतात. मंगळवारी विव्हळत पडलेल्या गाढवाला पाहून अनेकांनी लांबूनच जाणे पसंत केले. तर काही प्राणी मित्रांनी त्याला लांबूनच पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात गाढवाचे उपचार करण्यासाठी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आले तेव्हा रस्त्यावर पडलेल्या गाढवाला बाजूला घेण्यासाठी कोणीच जवळ आले नाही. त्यामुळे भररस्त्यावरच गाढवाला सलाईन लावून उपचार करण्यात आले. 

मी काम करत असलेल्या दुकानासमोर गाढव तडफडत पडले होते. त्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. मरणाच्या स्थितीतील अवस्था गाढवाची झाल्याने आम्ही त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या वेदना न थांबल्याने प्राणी मित्राला बोलावण्यासाठी नागरिकांना सांगितले.- बाळासाहेब कदम, सुरक्षारक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSocialसामाजिक