जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST2021-03-13T05:12:29+5:302021-03-13T05:12:29+5:30

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कऱ्हाड येथे प्रीतिसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ...

Greetings from Zilla Parishad office bearers to Yashwantrao Chavan | जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कऱ्हाड येथे प्रीतिसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्यानंतर कऱ्हाडमधीलच बचत भवनमधील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभा पार पडल्या.

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी १९ फेब्रुवारीला किल्ले प्रतापगडावर शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यानंतर महाबळेश्वरात विविध विषय समित्यांच्या सभा होतात, तर १२ मार्चला कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात येते. तसेच विविध विषय समित्यांच्या सभा होतात. यावर्षीही कऱ्हाड येथे हा कार्यक्रम झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स आणि गर्दी न करता कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी सकाळी आठ वाजता पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्य कऱ्हाडकडे रवाना झाले.

कऱ्हाड येथे सकाळच्या सुमारास प्रीतिसंगमावर जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बाल कल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण समिती सभापती कल्पना खाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, प्रीतिसंगमावर अभिवादन केल्यानंतर बचत भवनमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध विषय समित्यांच्या सभा झाल्या.

फोटो १२सातारा झेडपी नावाने...

फोटो ओळ : कऱ्हाड येथे प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

......................................................

Web Title: Greetings from Zilla Parishad office bearers to Yashwantrao Chavan