यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST2021-03-13T05:12:22+5:302021-03-13T05:12:22+5:30

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनानमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रतिमेस ...

Greetings to Yashwantrao Chavan at the Collectorate | यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनानमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

.......

परिचारक पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

सातारा : भारतीय रिजर्व बँक, मुंबई येथे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांकडून वर्ग ४ कार्यालय परिचारक या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुकांनी १५ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

..................

पालिका सुट्टीदिवशीही सुरू

सातारा : शहरातील निवासी, तसेच बिगर निवासी या मिळकतधारकांनी मिळकत कराचा भरणा व पाणी कर भरणा भरावा. यासाठी पालिकेचे कार्यालय ३१ मार्चपर्यंत सुटीदिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे वसुली अधीक्षक प्रशांत खटावकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Greetings to Yashwantrao Chavan at the Collectorate