साईसम्राटतर्फे संभाजीराजेंना अभिवादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:31+5:302021-05-19T04:39:31+5:30
कराड : ‘छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी राजे हे महाप्रतापी, शूर, चारित्र्यवान, नीतिमान राजे होते. त्यांच्या कार्यातून सदैव सर्वांना प्रेरणा ...

साईसम्राटतर्फे संभाजीराजेंना अभिवादन!
कराड : ‘छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी राजे हे महाप्रतापी, शूर, चारित्र्यवान, नीतिमान राजे होते. त्यांच्या कार्यातून सदैव सर्वांना प्रेरणा मिळत राहील,’ असे मत साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस, हॉटेल मॅनेजमेंट अँड शेफ आर्ट्स, मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील विजयसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
येथील साईसम्राट इन्स्टिट्यूटच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या ३६४व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी धैर्यशील पाटील बोलत होते.
धैर्यशील पाटील म्हणाले, ‘शस्त्र आणि शास्त्रामध्ये छत्रपती संभाजीराजे निपूण होते. एकही लढाई न हरलेले संभाजी राजे एकमेव राजे होते. वयाच्या १४व्या वर्षी बुधभूषणम, सातसतक, नायिकाभेद यांसारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. वडील छत्रपती शिवाजीराजे व आजी राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून छत्रपती संभाजीराजे यांनी इतिहास रचला. संभाजी राजेंची राज्यव्याप्ती सह्याद्रीपासून नागपूर व दक्षिणेला तंजावरपर्यंत होती. ते महापराक्रमी योद्धा होते, मराठा साम्राज्याचे व जगाचे प्रेरणास्रोत आहेत.
यावेळी साईसम्राटचे संचालक शेफ सम्राटसिंह पाटील, साईसम्राट अर्बनचे व्यवस्थापक प्रा. विजय जाधव, अभिजित माने, अर्पिता गांधी, स्वप्नील तावरे, सुयोग तावरे उपस्थित होते. (वा प्र)
फोटो ओळ
कराड येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६४व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना धैर्यशील पाटील. यावेळी सम्राटसिंह पाटील, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.