राष्ट्रवादी युवतीतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:54+5:302021-02-05T09:18:54+5:30
सातारा : कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या कोविड योध्दा युवती आणि महिलांचा सत्कार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने घेण्यात आला. खा. ...

राष्ट्रवादी युवतीतर्फे सत्कार
सातारा : कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या कोविड योध्दा युवती आणि महिलांचा सत्कार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने घेण्यात आला.
खा. सुप्रिया सुळे तसेच युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस सातारा जिल्हा यांच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कोरोना काळात ज्या युवतींनी निर्भिडपणे कार्य केले त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मोना निकम, रेश्मा गाडेकर, अपर्णा निकम, मोहिनी जाधव, अश्विनी साबळे, मृणाल शिंदे या युवतींचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास सुनील माने, सुरेखा पाटील, राजकुमार पाटील, समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, उषा जाधव, स्मिता देशमुख, पूजा काळे, शुभांगी कांबळे, कोमल घोरपडे, सिद्धी साळुंखे उपस्थित होते.
फोटो आहे