१२१ किलोमीटर सायकल चालवून खशाबा जाधव यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:02+5:302021-09-02T05:24:02+5:30
पिंपोडे बुद्रुक : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत हिवरे येथील प्राथमिक क्रीडा शिक्षक अमीर आतार यांनी कोरेगाव ते कऱ्हाड ...

१२१ किलोमीटर सायकल चालवून खशाबा जाधव यांना अभिवादन
पिंपोडे बुद्रुक : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत हिवरे येथील प्राथमिक क्रीडा शिक्षक अमीर आतार यांनी कोरेगाव ते कऱ्हाड व परत कऱ्हाड कोरेगाव असे १२१ किलोमीटर अंतर सायकलव्दारे पार करून देशाला ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक मिळवून देणारे कुस्तीपटू स्वर्गीय खशाबा जाधव यांच्या स्मृतीला अभिवादन केले. हिवरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील क्रीडा शिक्षक अमीर आतार यांनी २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत कोरेगाव ते कऱ्हाड हे अंतर सहा तास पंचवीस मिनिटांमध्ये सायकलव्दारे पार केले. देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याऱ्या कुस्तीपटू दिवंगत खशाबा जाधव यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना व्यायाम व आरोग्याचे महत्त्व लक्षात यावे तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये इंधन बचतीची जाणीव, जागृती व्हावी, यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अमीर आतार यांच्या या विधायक उपक्रमांची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे गटशिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, विस्ताराधिकारी विशाल कुमठेकर, शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, केंद्रप्रमुख आनंदा काकडे, मुख्याध्यापक मधुकर घार्गे, शिक्षक समिती अध्यक्ष नितीन शिर्के, अजित खताळ, तालुक्यातील शिक्षक, ग्रामस्थ, पालक यांनी कौतुक केले आहे.