आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:19+5:302021-02-07T04:36:19+5:30
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, मोहनराव पवार, गोरखनाथ ...

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, मोहनराव पवार, गोरखनाथ नलवडे, आनंदराव नलवडे, तुकाराम नलवडे उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, अविनाश नलवडे, सचिन नलवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगण्यात आले. पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी आणि संस्कृती रुजण्यासाठी थोर क्रांतिकारक पुरुषांचा इतिहास येणाऱ्या पिढीला माहिती होणे आवश्यक आसल्याचे सचिन नलवडे यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या जोतिर्लिंग पॅनलचे उमेदवार अविनाश नलवडे, मोहन पवार, अश्विनी मदने, शुभांगी नलवडे, सुनंदा निकम, वंदना शिवदास यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. कृष्णत मदने यांनी केले, तर आभार अप्पासाहेब वदक यांनी मानले.