कऱ्हाडला महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांकडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST2021-09-10T04:46:47+5:302021-09-10T04:46:47+5:30

कऱ्हाड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ''व्यर्थ न हो बलिदान'' म्हणत स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण लक्षात घेऊन स्मरणयात्रा काढली आहे. ...

Greetings from dignitaries to Mahatma Gandhi statue at Karhad | कऱ्हाडला महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांकडून अभिवादन

कऱ्हाडला महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांकडून अभिवादन

कऱ्हाड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ''व्यर्थ न हो बलिदान'' म्हणत स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण लक्षात घेऊन स्मरणयात्रा काढली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कराडात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे आज काँग्रेसने स्मरणयात्रा आयोजित केली होती. या ठिकाणी कार्यक्रमाला जाणाऱ्या नेत्यांनी कराडमध्ये थांबून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती.

या वेळी मान्यवरांचे स्वागत कऱ्हाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने यांनी केले. या वेळी शिवराज मोरे, नाना पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, प्रा. धनाजी काटकर, भागवतराव कणसे आदीं उपस्थित होते.

Web Title: Greetings from dignitaries to Mahatma Gandhi statue at Karhad