कऱ्हाडात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:51+5:302021-02-05T09:15:51+5:30

शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन शाखाप्रमुख नरेंद्र लोहार, सुभाष भिलवडे, शहरप्रमुख मधुकर शेलार, शशीराज करपे, सूर्यकांत मानकर यांनी केले. बाळासाहेब ठाकरे ...

Greetings to Balasaheb Thackeray in Karhad | कऱ्हाडात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

कऱ्हाडात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन शाखाप्रमुख नरेंद्र लोहार, सुभाष भिलवडे, शहरप्रमुख मधुकर शेलार, शशीराज करपे, सूर्यकांत मानकर यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन तालुकाप्रमुख नितीन काशीद-पाटील व महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनिताताई जाधव यांनी केले.

यावेळी शिवसेना कऱ्हाड तालुकाप्रमुख नितीन काशीद म्हणाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला वारसा घेऊन शिवसेनेची वाटचाल चालू आहे. आजपर्यंत अनेक संकटे आली. वादळे आली. मात्र या सर्वांना तोंड देत शिवसेना वाटचाल करीत आहे. शिवसेनेतून आत्तापर्यंत तीनवेळा मुख्यमंत्री झाले. तोच वारसा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण व त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कार्य आहे.

महिला आघाडीप्रमुख अनिता जाधव व प्रभू शशीराज करपे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमांतर्गत कऱ्हाड दक्षिणमधील ग्रामपंचायतीत यश मिळवलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन दिलीप यादव यांनी केले, तर मधुकर शेलार यांनी आभार मानले. यावेळी शिवसेना शाखा शास्रीनगरच्या नामफलकाचे उद्घाटन कविता यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

फोटो : २५केआरडी०४

कॅप्शन : शास्रीनगर-मलकापूर येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नरेंद्र लोहार, सुभाष भिलवडे, मधुकर शेलार, शशिराज करपे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Balasaheb Thackeray in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.