भावी पिढी घडवण्याचे महान कार्य शिक्षकांचे : संतोष भांदिर्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:08+5:302021-03-25T04:37:08+5:30
पाचवड : शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. खरा शिक्षक कोण असतो, तर विद्यार्थ्याला जो जीवन ...

भावी पिढी घडवण्याचे महान कार्य शिक्षकांचे : संतोष भांदिर्गे
पाचवड : शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. खरा शिक्षक कोण असतो, तर विद्यार्थ्याला जो जीवन जगण्याची कला शिकवितो. शिक्षक हा खऱ्या अर्थाने भावी पिढी घडविण्याचे काम करीत असतो,’ असे प्रतिपादन शिवव्याख्याते संतोष भांदिर्गे यांनी केले.
कुडाळ (ता. जावळी) येथील महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक बर्गे, वसंतराव सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, स्मिता सूर्यवंशी, प्रा. लक्ष्मण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत योग्य अंतर राखीत कार्यक्रम झाला.
यावेळी भांदिर्गे म्हणाले, ‘आई-वडिलांच्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मविश्वास जागविणारा असतो तो शिक्षक. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागविल्यास तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होत असतो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही उपस्थिती आहे, ती लाख मोलाची आहे. प्रा. डॉ. महेश गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुकर सूर्यवंशी व स्मिता सूर्यवंशी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक, विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. पाचगणी येथील शालोम इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. एम. बी. कोळी यांनी आभार मानले.
२४ पाचवड
कुडाळ येथे कार्यक्रमप्रसंगी शिवव्याख्याते संतोष भांदिर्गे यांचा सत्कार करण्यात आला.